Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर गुरुवारी (ता. 21) हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी […]

अधिक वाचा...

अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री

नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणात आता ज्याने धडक दिली त्या वाहनचालकाने अपघातग्रस्ताला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यास त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार आहे. पण धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा देण्यात येईल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले. गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटिशकालीन कायद्यांऐवजी तीन नव्या कायद्यांची जागा घेणारे विधेयक सादर करताना ते बोलत होते. […]

अधिक वाचा...

महेंद्र सिंह धोनीवर टीका करणे भोवले; आयपीएस अधिकाऱ्याला शिक्षा…

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धोनीच्या बाजूने निकाल देताना आयपीएस अधिकारी संपथ कुमार यांना शिक्षा सुनावली आहे. मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीत आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्याला उत्तर […]

अधिक वाचा...

संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा पोलिसांच्या ताब्यात…

नवी दिल्ली : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. चार आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हाच असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवरा पत्नी आणि मुलीला सोडून आग्रा येथे प्रेयसीसोबत राहात असल्याची माहिती पत्नीला समजली होती. दोघे घरात एकत्र असल्याचे समजल्यानंतर पत्नीने दरवाजा वाजवायला सुरवात केली. पण, घाबरलेला पती दरवाजा उघडत नव्हता. अखेर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावत राहिली, मात्र दोघेही बाहेर आले नाहीत. पत्नी सोबत तिची मुलगीही […]

अधिक वाचा...

संसद भवनाच्या सभागृहात घुसखोरी; सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई…

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना सभागृहात घुसखोरी केल्यानंतर संसद भवनाच्या ८ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन तरुणांनी संसदेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत आत स्मोक कँडल लावल्या होत्या. तर दोघांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत स्मोक कँडल पेटवल्या. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती […]

अधिक वाचा...

संसदेत कसे घुसले? चौकशीत आलं समोर; गुन्हा दाखल…

नवी दिल्ली : लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिली. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज (गुरुवार) संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शहा दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे. संसदेच्या सुरक्षेला भेदून लोकसभेत कामकाजावेळी […]

अधिक वाचा...

Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?

नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज सुरू असताना आज (बुधवार) दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदार बसतात तिथे उडी मारली. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितले. संसदेत पकडलेल्यांपैकी एकजण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याची माहिती पुढे आली आहे. लातूरचा अमोल शिंदे आणि हिस्सारची नीलम सिंग अशी दोघांची […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

रामगढ (छत्तीसगड) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरा-नवरी मोटारीमधून घरी निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (रविवार)) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्तीसगढच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या कारला ट्रकने जोराची […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video: पोलिस अधिकाऱ्यामुळे महिलेला गमवावा लागला जीव….

लखनौ (उत्तर प्रदेश): अलिगढ येथे पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या महिलेला पोलिस अधिकाऱ्याकडून चुकून गोळी लागली आणि इशरत जहाँ या महिलेला जीव गमवावा लागला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलिगढच्या ऊपरकोट पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेली महिला कार्यालयात पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी संबंधित कर्मचाऱ्याची वाट पाहत होती. त्यावेळी, पोलिस ठाण्यातील अधिकारी हातात बंदुक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!