संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा पोलिसांच्या ताब्यात…

नवी दिल्ली : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. चार आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हाच असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. ललित झा यानेच 13 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती, असे चौकशीत समोर आले. लोकसभेतील घुसखोरीनंतर ललित हा राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तिथे आपल्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर पोलिस शोधत असल्याचे त्याला कळाले त्यानंतर ललित बसने दिल्लीला आला. पोलिसांनी त्यानंतर ललितला अटक केली.

गुरूग्राममध्ये ललित झा याने एक महत्त्वाची बैठक घेत हा कट आखला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. लोकसभेत मनोरंजन आणि सागर शर्माने घुसखोरी केली तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून या प्रकाराचे शुटींग ललितनेच केले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. तसेच, ललित झासोबत चौघेही आरोपी संपर्कात होते. घटना होण्याआधी त्याने चौघांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला, असे पोलिसांनी सांगितले. ललित झा याचा संबंध असलेल्या एका एनजीओचीही चौकशी केली जात आहे. या एनजीओला येणारा निधी कुठून येतो याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग जवळपास दीड-दोन वर्षांपूर्वी केल्याचे समजते. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सगळ्यांची पहिली एकत्रित बैठक मनोरंजनच्या कर्नाटकातील मैसूरमधील घराजवळ झाली. बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवर सरकारला जागं करण्यासाठी काही तरी मोठे करण्याचा प्लॅन त्यांनी केला. 13 डिसेंबर तारीख निश्चित केल्यांनतर सर्व जण 10 तारखेपर्यंत दिल्लीला पोहोचले. तीन दिवस शर्माच्या घरी राहिल्यानंतर 13 तारखेला सकाळी सर्व जण संसद परिसराजवळ पोहोचले. फक्त दोन पास मिळाल्यामुळे मनोरंजन आणि सागर शर्मा संसदेच्या आत गेले आणि ही घटना घडवून आणली.

संसद भवनाच्या सभागृहात घुसखोरी; सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई…

संसदेत कसे घुसले? चौकशीत आलं समोर; गुन्हा दाखल…

Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!