महेंद्र सिंह धोनीवर टीका करणे भोवले; आयपीएस अधिकाऱ्याला शिक्षा…

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धोनीच्या बाजूने निकाल देताना आयपीएस अधिकारी संपथ कुमार यांना शिक्षा सुनावली आहे.

मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीत आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्याला उत्तर दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.

धोनीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करत माध्यमे, अधिकारी आणि काही जणांवर बदनामीचा आरोप केला होता. आयपीएल २०१३ च्या फिक्सिंग प्रकरणात नाव घेतल्याचा आरोप धोनीने केला होता. आपल्यावर कोणीही निराधार असे आरोप करू नयेत यासाठी न्यायालयात विनंती केली होती. न्यायालयानेही यासंदर्भात आदेश दिला होता.

दरम्यान, आयपीएस अधिकारी वगळता इतरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. आयपीएस अधिकाऱ्याने आयपीएल फिक्सिंग प्रकरणी धोनीवर चुकीचे आरोप करणे सुरूच ठेवले. शेवटी याबाबत धोनीकडून न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने अधिकाऱ्याला १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आयपीएस वडिलांचा आदर्श! वकिली सोडून ईशा सिंह बनल्या आयपीएस…

तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…

आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!