
संसदेत कसे घुसले? चौकशीत आलं समोर; गुन्हा दाखल…
नवी दिल्ली : लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिली. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज (गुरुवार) संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शहा दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे.
संसदेच्या सुरक्षेला भेदून लोकसभेत कामकाजावेळी घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांना बुधवारी(ता. १३) सायंकाळी अटक करण्यात आली होती. चारही आरोपींची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आता धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. संसदेत घुसण्याचा प्लॅन जवळपास दीड वर्ष आधीच तयार करण्यात आला होता असा खुलासा चौकशीत झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी हे सोशल मीडिया पेज भगत सिंग फॅन क्बलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. दीड वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये त्यांची भेट झाली होती. तिथेच त्यांनी कट रचण्यास सुरुवात केली होती. १० डिसेंबरला सगळे दिल्लीत पोहोचले होते आणि गुरुग्राममध्ये विकीच्या घरी थांबले. त्याठिकाणी ललित झा सुद्धा रात्री उशिरा पोहोचला होता. संसदेत घुसखोरी करण्याआधी आरोपींनी संसदेची रेकीही केली होती. जुलैमध्ये सागरला संसद भवनाची रेकी करण्यासाठी लखनऊहून दिल्लीला पाठवले होते. मात्र, जुलै महिन्यात सागर संसद भवनाच्या आत जाण्यात यशस्वी ठरला नव्हता. तो संसद भवनाच्या बाहेर गेट आणि सुरक्षा चौकशीची रेकी करून गेला होता. सर्व आरोपी सोशल मीडियावर संपर्कात आल्यानंतर एका ऍपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात होते.
महाराष्ट्रातील अमोल शिंदेने स्मोक कँडल आणली होती. संसदेत जाण्याआधी सर्वजण इंडिया गेटवर भेटले होते. तिथेच त्यांनी स्मोक कँडल वाटून घेतले. दुपारी एकच्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी संसदेत पोहोचले तर अमोल शिंदे आणि नीलम आझाद संसदेबाहेर होते. ललित या सर्वांचा व्हिडीओ तयार करत होता. गोंधळानंतर पोलिसांनी अमोल आणि नीलमला ताब्यात घेतले. तर ललित सर्वांचे फोन घेऊन तिथून पळून गेला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाच जणांचा मास्टरमाईंड कुणीतरी वेगळाच आहे, ही सहावी व्यक्ती या पाच जणांना रसद पुरवत होती, असाही पोलिसांना संशय आहे.
#WATCH | An unidentified man jumps from the visitor’s gallery of Lok Sabha after which there was a slight commotion and the House was adjourned. pic.twitter.com/Fas1LQyaO4
— ANI (@ANI) December 13, 2023
Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?
राज्यात होणार 23 हजार 628 पोलिस शिपयांची पदभरती: गृहमंत्री
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

