बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट आले आहे.

शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदे याच्यावर आहे, मात्र या प्रकरणात त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला फसवलं जात असल्याचा दावा केला आहे. आपल्या मुलाची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी, ज्यामुळे तो निर्दोष असल्याचे समोर येऊ शकते, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘अक्षय 23-24 वर्षांचा आहे. तो असे करू शकत नाही. तो आधी माझ्यासोबत सोसायटीची कामं करायचा. त्याने गुन्हा केला असेल तर माझ्यासमोर त्याला फाशी दिली तरी चालेल, पण माझा मुलगा असे काही करणार नाही, यावर मला विश्वास आहे. मी पण तिकडेच झाडू मारायच्या कामाला आहे. अक्षय दहावी नापास आहे. तो असे काही करू शकत नाही. माझा लहान मुलगा शाळेत काम करायचा त्याला शाळेत शिपाई करून घेतले. मोठा मुलगा करणार नाही म्हणत होता, पण मी कर म्हणाले. सोसायटीची कामं करत होता. त्याचा पाय दुखायचा. तुला एकाच ठिकाणी बाथरूम साफ करायचे आहे. आपलं काम झालं की तिकडे जाऊन बसायचं आहे, म्हणून त्याला कामाला लावले,’ असे अक्षय याच्या आईने म्हटले आहे.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!