Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?

नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज सुरू असताना आज (बुधवार) दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदार बसतात तिथे उडी मारली. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितले. संसदेत पकडलेल्यांपैकी एकजण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याची माहिती पुढे आली आहे. लातूरचा अमोल शिंदे आणि हिस्सारची नीलम सिंग अशी दोघांची नावे आहेत.

संसदेच्या बाहेर दोघांकडून घोषणाबाजी करत स्मोक कँडल जाळण्यात आली. या दोघांनी प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेत उडी मारली त्यानंतर खासदारांकडून यातल्या एकाला मारहाण करण्यात आली. संबंधित व्हिडिओ आता समोर आला आहे. गोंधळ घालणारा युवक आणि युवतीला अटक करण्यात आली आहे. संसदेत आणि बाहेर जे घोषणाबाजी करत होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांची पोलीस चौकशी करत आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.

दरम्यान, संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज (बुधवार) दुपारी कामकाज सुरू असताना अचानक एका तरुणाने जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात उडी मारली. हा तरुण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेला होता. सभागृहात उडी मारल्यानंतर घोषणाबाजी करत आणि खासदारांच्या टेबलावरून उड्या मारत हा तरुण पुढे जात होता. पण त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी या युवकाला पकडले. म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावे पास तयार केले होते, अशी माहितीही समोर आली आहे.

२001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण होत आहे. संसदेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उड्या मारत पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतर कामकाज अचानक दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. घटनेनंतर लगेचच या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. संसद भवनात घडलेल्या या घटनेचं लातूर कनेक्शन समोर आले आहे.

अमोल धनराज शिंदे…
संसद भवन येथे गोंधळ घालत स्मोक कँडल पेटवणारा युवक हा चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील अमोल धनराज शिंदे हा आहे. अंदाजे 25 ते 27 वर्षांचा तरुण असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाशी या प्रकरणाचा कसलाही संबंध नसून अमोल शिंदे हा दलित समाजाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अमोल शिंदे याच्या घरची परिस्थिती बेताची आहे, आई वडील मजूरी करतात. अमोल शिंदे हा सैन्य भरतीची तैयारी करत होता, अशी ही माहिती समोर आली आहे. अमोल शिंदे याच्या झरी येथील घरी चाकूर पोलीस दाखल झाले असून, अमोल शिंदे याच्या आई वडिलांची चौकशी सध्या करत आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदेच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला आहे.

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!