सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…
धाराशिव: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे आज (शनिवार) गाडीचे टायर्स फुटल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन आज सकाळी जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. धाराशिवमधील अणदूर परिसरात […]
अधिक वाचा...पुणे! टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर लावला मोक्का; दणाणले धाबे…
पुणे: पुणे शहरातील हडपसर परिसरातील काही भागात सातत्याने दहशत माजवणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर वचक बसावा, यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हडपसरमधील सय्यदनगर आणि काळेपडळ परिसरात भाईगिरी करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू […]
अधिक वाचा...प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा…
वर्धा: वर्धा शहरात आयोजित केलेल्या प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान तुफान राडा झाला. मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरील डान्स नीट दिसत नसल्याच्या कारणावरून हा राडा सुरू झाला आणि एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्यामुळे मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही प्रेक्षक एकमेकांच्या दिशेने प्लास्टिकच्या खुर्च्या फेकत होते. जमिनीवर खुर्च्या आदळून त्यांची तोडफोड करण्यात आली. या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
पुणे: पुणे शहरचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळी आक्रमक झाली आहे. आंदेकर टोळीने मागील तीन महिन्यात दोन खून केले आहेत. यामध्ये आयुष कोमकर आणि गणेश काळे याचा समावेश आहे. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळेच्या भावाची गोळ्या घालून हत्या […]
अधिक वाचा...पुणे! मोमोजचा व्यवसायातून घेतली थार कार अन् सहा मित्रांची ट्रिप ठरली शेवटची…
पुणे: हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील सहा मित्र आपल्या नवीन कोऱ्या थार गाडीतून कोकणात फिरायला निघाले होते, पण मंगळवारी त्यांची ही कार घाटातील ५०० फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात जीवघेणा ठरला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये साहिल गोठे (वय २४) हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय […]
अधिक वाचा...पुणे! चुलत भावाची हत्या करून मृतदेह भरला पोत्यात अन् फेकला…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एका युवकाने आपल्या सख्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी भावाचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अजय पंडित असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. अशोक […]
अधिक वाचा...पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे : कोकणात जाताना ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाला असून, सहा युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंगळवारी (ता. १८) रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज (गुरुवार) ही घटना उघडकीस आली. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे […]
अधिक वाचा...पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…
पुणे : एका महिलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तब्बल दोन ते तीन दिवस आरोपींनी महिलेचा मृतदेह घरात लपवून ठेवला आणि जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मृतदेह कचरापेटीत फेकून सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा (वय अंदाजे 40) […]
अधिक वाचा...सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हणाला…
नवी दिल्ली: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमधील विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (रा. राजीवनगर, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील […]
अधिक वाचा...गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोल याला NIAने घेतले ताब्यात…
नवी दिल्ली: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला आज (बुधवार) अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून, दिल्लीला आणण्यात आले आहे. एनआयएने त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले असून, पटियाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अमेरिकेतून एकूण 200 जणांना हद्दपार करण्यात आले आहे, ज्यात भारतातील तीन जणांचा समावेश आहे. गँगस्टर अनमोल हा एप्रिल 2024 मध्ये बॉलिवूड स्टार […]
अधिक वाचा...
