
सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हणाला…
नवी दिल्ली: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमधील विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (रा. राजीवनगर, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात भागात वास्तव्यास होता. दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 18) घडली आहे. आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे शौर्य याने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली. त्यात ‘मेरा नाम शौर्य पाटील हैं… इस मोबाइल… नंबर पर कॉल कर देना प्लीज… आय अॅम व्हेरी सॉरी… आय डीड धीस…पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया… सॉरी भैय्या… सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं… स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू….असा स्कूल बॅगमध्ये सापडली सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता.
नांदेड हादरलं! मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…
पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…
सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या…
पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

