
येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रजासत्ताक दिन साजरा…
पुणे (संदिप कद्रे): येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच २६ जानेवारी २०२४ करीताचे कारागृह विभागातील ०९ अधिकारी / कर्मचारी यांना सन्मानीय राष्ट्रपतीचे गुणवत्तापुर्ण सेवेबाबतचे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी- १ रुकमाजी नरोड, तुरुंगाधिकारी श्रेणी – १ सुनिल पाटील, सुभेदार बळीराम पाटील, सुभेदार सतिश गुंगे, हवालदार सुर्यकांत पाटील, हवालदार नामदेव भोसले, हवालदार संतोष जगदाळे, हवालदार नवनाथ भोसले, हवालदार विठ्ठल उगले यांना सन्मा. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाल्याबाबत त्यांचा अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सन २०२४ मध्ये गुणवत्तापुर्ण सेवेकरिता संपुर्ण भारतातून महाराष्ट्र कारागृह विभागास सर्वाधिक ०९ राष्ट्रपती पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे.
सदर कार्यक्रमास कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक, बी. एन. ढोले, उपअधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक रविंद्र गायकवाड, उपअधीक्षक मंगेश जगताप, आनंदा कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कारागृह मुख्यालयाकडील स्वीय सहायक कैलास शेटे, आनंदा कांबळे व इतर कक्ष अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल…
येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!
येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…
येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू…
महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

