
पुणे! मोमोजचा व्यवसायातून घेतली थार कार अन् सहा मित्रांची ट्रिप ठरली शेवटची…
पुणे: हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील सहा मित्र आपल्या नवीन कोऱ्या थार गाडीतून कोकणात फिरायला निघाले होते, पण मंगळवारी त्यांची ही कार घाटातील ५०० फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात जीवघेणा ठरला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतांमध्ये साहिल गोठे (वय २४) हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे पुण्यात तीन स्टॉल होते. गरिबीशी झुंज आणि व्यवसायात केलेल्या प्रगतीमधून त्याने अवघ्या २० दिवसांपूर्वी स्वतःची नवीन थार कार घेतली. जिवलग मित्र शिवा माने (वय २०), प्रथम चव्हाण (वय २३), श्री कोळी (वय १९), ओमकार कोळी (वय २०) आणि पुनीत शेट्टी (वय २१) यांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण दाखवण्यासाठी निघाला होता. पण, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात सहाही जिवलग मित्रांचा अंत झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दरीत कोसळलेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या रेस्क्यू टीमने हा अत्यंत अवघड बचाव कार्य हाती घेतले. पोलिस प्रशासनही या बचाव कार्यात मदत करत आहेत. रेस्क्यू टीम दोरखंडाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत आहेत. नवीन थारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण…
ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू…
ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…
पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

