हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…

लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एका 14 वर्षांच्या मुलाला कुत्रा चावला होता. पण, घरच्यांपासून त्याने ही बाब लपवली होती. मुलाचा रेबिजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याने वडिलांच्याच मिठीत प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलाला दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्याचा कुत्रा चावला होता. पण, आई-वडिलांच्या भीतीमुळे मुलाने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि स्वत:च जखमेवर हळद लावली. जवळपास महिना उलटल्यानंतर, म्हणजेच 1 सप्टेंबरपासून मुलगा विचित्र वागू लागला आणि त्यावेळी त्याने घरच्यांना कुत्रा चावल्याबद्दल सांगितले. कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला रेबिज झाल्याचे सांगितले. विविध रुग्णालय फिरुनही कोणी मुलाला दाखल करुन घेण्यास तयार नव्हते. अखेर 4 सप्टेंबरला मुलाने तडफडून वडिलांच्या कुशीत जीव सोडला.

शाहबाज असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहवाज हा विजय नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या चरण सिंह कॉलनीत राहात होता. शाहबाजला शेजाऱ्यांचा कुत्रा चावला होता. मात्र, भीतीने त्याने घरच्यांपासून ही गोष्ट लपवली होती. जवळपास महिना उलटला आणि शाहबाज विचित्र वागू लागला. कुत्रा चावल्याच्या काही दिवसांनंतर तो हवा, प्रकाश आणि पाण्याला घाबरु लागला. तो अंधारात राहणं पसंत करू लागला. मधेच तो मोठमोठ्याने ओरडायचा. हा सर्व प्रकार घडणे सुरू झाले आणि शाहबाजने कुटुंबियांना कुत्रा चावल्याच्या घटनेची माहिती दिली.

शाहबाजचे कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले आणि डॉक्टरांनी त्याला रेबीज झाल्याचे सांगितले. परंतु कोणतंही रुग्णालय शाहबाजवर उपचार करण्यास तयार नव्हते. दिल्लीच्या जीटीबी आणि एम्समध्येही शाहबाजचे वडील याकुब त्याला घेऊन गेले. पण, डॉक्टरांनी रेबिजवर उपचार शक्य नसल्याचे सांगितले. शेवटी शाहबाजचे वडील आयुर्वेदिक उपचारांसाठी त्याला बुलंदशहरात घेऊन गेले. मात्र तिथून गाझियाबादला परत येत असताना रुग्णवाहिकेमध्येच शाहबाजचा मृत्यू झाला. वडिलांच्या कुशीत तडफडून त्याने जीव सोडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला होत आहे, त्यात शाहबाज वडिलांच्या कुशीत हुंदके देऊन रडत होता. आमच्या मुलावर आलेली वेळ अन्य कोणावरही येऊ नये, अशी मागणी शाहबाजच्या कुटुंबियांनी केली.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी शाहबाजच्या शेजारी राहणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून कुत्र्याच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. आमच्या कुत्र्याला लस देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण शेजारच्यांनी दिले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!