जेसीबी वाहनावर अवैध कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस…

घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील जेसीबी वाहन अवैधरित्या जप्त केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी (महसूल) सुहास लक्ष्मण गाडे, घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. सदर प्रकरणात ११ मार्च २०२५ पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी दिले आहे.

घाटंजी येथील सागर सुभाष भोयर, रविंद्र गणपतराव बिडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचीका दाखल करून त्यात शासनातर्फे पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास लक्ष्मण गाडे, तहसीलदार घाटंजी, ठाणेदार घाटंजी व मंडळ अधिकारी शिरोली यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्या सागर भोयर यांची बाजू ॲड. महेश धात्रक यांनी उच्च न्यायालयात मांडली.

सदर प्रकरणावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. घाटंजी तालुक्यात आमडी येथे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती महसुल विभागाला प्राप्त झाल्यानंतर घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आमडी येथील एका शेतात छापा टाकला असता, येथे जेसीबीद्वारे मुरुम काढले जात होते व २ ट्रॅक्टर मधून वाहतूक केली जात होती, असा आरोप आहे. दरम्यान घाटंजी पोलीसांनी सदर जेसीबी जप्त करुन घाटंजी पोलीस स्टेशनला लावण्यात आला. घाटंजी पोलीसांनी तसा अहवाल घाटंजी तहसीलदार विजय साळवे यांना पाठविला. महसूल विभागाचे पथक मोक्यावर जाऊन पंचनामा करुन तसा अहवाल तहसीलदार यांचे कडे सादर केला. त्यावरुन घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे २७ डिसेंबर २०२४ रोजी अहवाल पाठविला. त्या अहवालानुसार जेसीबी वाहन मालक यांना ७ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या कारवाईची वैद्यता सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे आढळुन आले नाही. त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे, पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांचेवर कारवाई का करण्यात येऊ नये. तसेच पिडीत वाहन मालकांना नुकसान भरपाई का अदा केली जाऊ नये, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी नोटीस द्वारे विचारणा केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी युक्तीवाद केला. तर शासनाची बाजू अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. के. मारपकवार यांनी मांडली. दरम्यान, जप्त केलेले जेसीबी वाहन उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सोडून देण्याची आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटकेनंतर छातीत लागले दुखू…

पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…

FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…

कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!