
पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे : सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केशवनगर (मुंढवा) येथे घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
त्रिष्णा राहुल सकपाळ (वय 33, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74 , रा. केशवनगर) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, हडपसर) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिष्णा हिचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी 13 तोळे सोन्याचे दागिने दिले होते. त्रिष्णा ही एका आयटी कंपनीत नोकरीस होती. संपूर्ण पगार देण्यासह माहेरची सदनिका सासूच्या नावावर करण्यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. तसेच, सासऱ्यांनी तिच्या नावावर एक कोटीची सदनिका घेऊन देण्याचा तगादा लावला होता. वारंवार होणाऱ्या मारहाण व छळामुळे दोघे पती-पत्नी 2021 मध्ये केशवनगर येथे वेगळे राहू लागले. मात्र, तिथेही पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्याने ती माहेरी निघून आली होती. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.
दरम्यान, 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तृष्णा हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेसासू यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून, तेच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत,’ असा उल्लेख केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…
पुणे! प्रेमाच्या त्रिकोणातून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या…
पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

