वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

बीडः मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि हत्येचे मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करली आहे. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड विरोधात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा सुनिल कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराड याच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज करण्यात आला असून, सुनिल कराड याने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तूलाच्या धाकाने 2 बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

पीडित महिलेने न्यायालयाकडे केलेल्या अर्जानुसार, सुशील कराड याने आपल्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. यावेळी त्याने दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुशील कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात दाखल झालेल्या या अर्जावर अद्याप न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही. मात्र, याबाबतची सुनावणी सुरू आहे. पीडित महिलेने यापूर्वी सोलापूर पोलिस आयुक्त आणि बीडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. यामुळे न्यायालयाचा आधार घेत तिने खाजगी तक्रार दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने सुशील कराड आणि त्याच्या मित्रांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 13 जानेवारी रोजी होणार असून, त्यात एफआयआर दाखल करण्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलिस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी बीड मधील लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे साऱ्यांना माहिती आहे. मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे? सा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!