साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

मुंबई : मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली. प्रफुल सुर्वे असे मृत्यू झालेल्या या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत प्रफुल सुर्वे हे सहभागी झाले होते. मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान शुक्रवारी (ता. १०) सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी चालत जात असे. यंदाही आपली नियमित पायी वारी करण्यासाठी ते यात्रेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मुंबई ते शिर्डी 240 किमी अंतर आहे. हे अंतर कापताना त्यांनी तब्बल 230 किमीपर्यंत पायी प्रवास केला. शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे 10 किलोमीटरचे अंतर बाकी असतानाच सुर्वें यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि पोलिस दलावर शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रफुल्ल सुर्वे हे ३१ डिसेंबर २०२५ रोजी पोलिस दलातून निवृत्त होणार होते. ते १९९३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यांनी राज्य गुप्त वार्ता, वर्सोवा पोलिस ठाणे येथे सेवा बजावली होती. सध्या ते अंधेरी पोलिस ठाण्यात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत होते.

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाकाला रेल्वे रुळावर ढकलून मारले दोघांनी…

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!