
पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ येथे विचित्र अपघात झाला आहे. अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेऊन गाडीतील तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी (ता. १७ ) पहाटे सहा वाजेच्या सुमारास तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीही पूर्णपणे जळून खाक झाली असून स्विफ्ट कार चालक जखमी आहे, अशी माहिती मंचर पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर जी जे ०१ डब्लु बी १७३७ हा बंद अवस्थेत उभा होता. दरम्यानच्या काळात पुण्याहून नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो एम एच १२ क्यू जी३३५१ डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने आला व प्रथम स्विफ्ट गाडी एम एच १४ डी टी ०२९५ हिला समोरून धडक दिली व त्यानंतर उभ्या कंटेनरला जाऊन धडकला. या अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या अपघातात स्विफ्ट कार मधील अंकुश उर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे (वय ३२), वीरेंद्र विजय कदम (वय ३०, दोघेही रा. खेड ता. खेड), रोहिदास लक्ष्मण राक्षे (वय ३८ रा. राक्षेवा, ता. खेड) या तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे (वय ३२, रा. राजगुरूनगर ता. खेड) हा चालक जखमी झाला आहे.
घटनेची माहिती कळताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलिस हवालदार राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस जवान नंदकुमार संजय नाडेकर, योगेश रोडे संजय नलावडे यांनी प्रयत्न केले. अपघात रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे, गौरव बारणे, अमितकाटे, गणेश शिंदे यांनी अपघात मोलाची मदत केली.
दरम्यान, अपघात सकाळीच वर्दळीच्या वेळी झाला असल्याने व पुणे-नाशिक महामार्गावर बऱ्यापैकी गर्दी असल्याने हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी बराच वेळ कुणीही नसल्याने गर्दीत भर पडली व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, असे पिंपळगाव घोडा येथील राजेश वाकचौरे भावडी येथील प्रवासी विनायक चक्कर व पेठ येथील नवनाथ पवळे यांनी सांगितले.
सोलापूरमध्ये दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…
अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…
नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

