संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…
चंद्रपूर : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती. बापानेच पोटच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावात ही घटना घडली आहे. पती, पत्नी आणि दोनं मुलं राहतात. पोट भरण्याकरता पैसे कमावण्यासाठी या व्यक्तीची पत्नी एप्रिल महिन्यात कामासाठी दुसऱ्या राज्यात गेली होती. याच काळात मुलीच्या शाळेला सुट्टी लागली आणि ती आश्रम शाळेतून घरी परतली. पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत बापानेच मुलीवर अनेकदा बलात्कार केला.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
दरम्यान, काही दिवसांनी मुलीची शाळा पुन्हा सुरू झाली आणि ती शाळेसाठी परतली. यावेळी शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. पीडित मुलीची चौकशी केल्यावर हे संपूर्ण प्रकरण समोर आले. यानंतर शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरुन नागभीड पोलिसांनी आऱोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…
भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण गरोदर…
संतापजनक! अल्पवयीन गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर…
डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…