महिला पोलिस हात जोडत म्हणाल्या, मी आईच्या भावनेने रागावले…

लातूर : ए झिपरे, लाव तुझ्या बापाला फोन.. असे म्हणत तीन युवतींना मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने हात जोडत माफी मागितली आहे. त्या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबीयांना जे बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असे म्हणत वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे.

लातूरमधील एका चौकात ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या युवतांना अडवून चांगलेच सुनावल्याचे काम या महिला वाहतूक पोलिसाने केले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. त्यानंतर, वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे. जीव लई वर झाला का… रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन युवतींची भर रस्त्यावर तुफान शाब्दिक धुलाई केली होती. त्या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबीयांना जे बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असेही मुसने यांनी म्हटले आहे. वाहतूक पोलिसाने खडसावल्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर, आता प्रणिता मुसने यांनी हात जोडत माफी मागून हा विषय संपवला आहे.

दरम्यान, लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर वाहतूक नियमाचे उल्लंघन करत तीन मुली स्कुटीवरून भरधाव वेगात जात असल्याचे कर्तव्यावर असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या निदर्शनास आले. मात्र, या मुली भरधाव वेगात पुढे निघून गेल्याने गाडीचा पाठलाग करत ट्रॅफिक महिला कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी मुलींना आडवत खडे बोल सुनावले. लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर ही सर्व घटना घडली, हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आपला हेतू वाईट नव्हता. माझ्या मोठ्या व छोट्या दोन्ही मुलीसह मी ट्युशनला सोडवायला निघाले होते. तेव्हा या मुलींना रॅश ड्रायव्हिंग करत आमच्या गाडीला कट मारला. तसेच, इतरही गाड्यांना खेटून त्या पुढे जात होत्या. त्यांच्या या ड्रायव्हिंगमध्ये आम्हाला तर इजा होणारच होती, पण इतरांनाही दुखापत झाली असती. जर काही घडले असतं तर मी स्वत:ला माफ करू शकले नसते. मी भावनेच्या भरात त्यांना रागावले, पण एक आई म्हणून मी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. मला ड्युटीला जायचे असल्याने मी पोलिसाची वर्दी घातली होती, असेही प्रणिता मुसने यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHWARII💅 (@ishwariii16)

महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले…

पुणे! महिला पोलिस अधिकाऱ्याचा भाजपच्या नेत्याने केला विनयभंग…

मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…

IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!