पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…

नाशिक : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला नाशिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर पवार असे आरोपीचं नाव आहे.

सागर पवार याच्यावर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. तोतया पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक असलेल्या पत्नीच्या वर्दीचा तो वापर करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे. पोलिस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. नऊ महिन्यांपासून सागर पवार हा फरार होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचला आणि सागरला अटक केली आहे. या प्रकरणी आता त्याची चौकशी केली जाणार आहे.

सागर पवार याचे कारनामे…
– पत्नीच्या पोलिस गणवेशाचा वापर.
– पोलिस असल्याचे भासवत महिलांची फसवणूक.
– पोलिसांत असल्याची ओळख सांगून विविध ठिकाणी फिरायचा.
– विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल.
– नोकरी, गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचे आमिष.
– पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून पोलिस यंत्रणेचा गैरवापर.
– पोलिस असल्याचे भासवून ओळख लपवत राहणे.

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!