
राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस पाटील दत्ता पायगुडे…
दत्ता पायगुडे हे गेल्या पाच वर्षांपासून कुडजे (पुणे) गावचे पोलिस पाटील म्हणून काम पाहत आहेत. अल्प कालावधीत त्यांच्या कामाची ख्याती संपूर्ण राज्यात पोहोचली आहे. पोलिस स्टेशन मध्ये नियमित जाणारे ते राज्यातील एकमेव पोलिस पाटील आहेत. नुकतेच पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. विशेष म्हणजे ते पुणे शहर साठी पोलिस पाटील असताना पुणे ग्रामीण पोलिसांना सुद्धा मदत करतात.
गेल्या वीस वर्षांपासून ते समाजसेवेचे काम सुद्धा करत असून, शेतकऱ्यांना नेहमी मदत करत असतात. शेतकऱ्यांना छत्री वाटप, पावसाळी बुटांचे वाटप, गरीबांना कपडे वाटप, महिला दिनानिमित महिलांचा सन्मान, कोरोना काळात धान्य वाटप, त्यांनी असे बरेचसे उपक्रम राबविले आहेत. पुणे शहरातील उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या अधिपत्याखाली काम करत असून, पुणे शहरातील अत्यंत सतर्क पोलिस पाटील म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे
पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांचे आजोबा बाबुराव पायगुडे हे पुर्वी गावातील पोलिस पाटील रामराव पायगुडे यांच्या शेतामध्ये काम करत होते. आता ते स्वतः पोलिस पाटील झाले आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नाही. त्यांचे चुलते भिकोबा पायगुडे हे गावचे प्रथम सरपंच असून सलग पंधरा वर्षे गावचे सरपंच होते. दत्ता पायगुडे काम करत असताना गावातील आजी माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शेतकरी, कीर्तनकार, दुग्धव्यवसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांचे वेळवेळी मार्गदर्शन घेऊन काम करत आहेत.
पोलिस पाटील दत्ता पायगुडे सांगतात, ‘मी उत्तमनगर पोलिस स्टेशन येथे नियमित जातो. पोलिस निरीक्षक श्री. खंदारे दर महिन्याला मासिक मीटिंग घेतात. पोलिस पाटलांची खूप आस्थेने विचारपूस करतात, त्यामुळे खूप proud fill होते. अशा मीटिंग महाराष्ट्रातील कोणत्याच पोलिस स्टेशन येथे होत नसतील. त्यामुळे उत्तमनगर पोलिस स्टेशन आणि तेथील स्टाफ माझ्या खूप आवडीचे आहेत. कामाच्या अतिताणामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडते तसेच त्यांना कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही. बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबातील आणि लहान मुलांचे फोन येतात. परंतु, कामात व्यस्त असल्याने त्यांना असे फोन सुद्धा घेता येत नाहीत, ते प्रथम कामाला प्राधान्य देतात. परंतु, समाज पोलिसांकडे खूप चुकीच्या नजरेने पाहतात. याचे मला खूप वाईट वाटते. त्यामुळे पोलिस आणि त्यांच्या समस्यांसाठी एक दिवस राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि त्यांच्या निरोगी जीवनासाठी माझ्याकडे अजून काही नवीन कल्पना आहेत त्या सांगण्यासाठी त्यांची भेट घेणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुणे पोलिस कायमच धावून येतात. अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी मदतीसाठीचा डायल 112 योजना सुरु केली आहे. 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला 7 मिनिटामध्ये पोलिसांची मदत मिळते तसेच उत्तमनगर बीट मार्शल दिवसातून चार पाच वेळा गावाकडे येते त्यामुळे गावातील आणि आमच्या भागातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खूप मदत होते. महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष माझे मामे सासरेच आहेत.
पोलिस पाटील म्हणून राज्यातील पोलिस पाटील यांनी काय करावे हे आमचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कायम मार्गदर्शन करत असतात. आम्ही सर्व पोलिस पाटील त्यांच्या सूचनांचे पालन करतो. माझे गावं ग्रामीण भागात असल्याने शेतकरी तसेच घरगुती भांडणाचे वाद सतत होत असतात शक्यतो मी असे वाद गावातच मिटवतो. महिलांचे किंवा सासू सुनेचा वाद असेल तर गावच्या सरपंच मानसी सोनवणे यांना बरोबर घेऊन आम्ही दोघे संबंधित महिलेच्या घरी जाऊन चार भिंतीच्या आत वाद मिटवून येतो. गावात दोन राजकीय गट असल्याने काम करताना मला तारेवरची कसरत करावी लागते. लोकं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांची मने सांभाळावी लागतात. गावातील सर्व लोकांकडे माझा फोन नंबर आहेच परंतु गावाशेजारी बऱ्याच मोठमोठ्या लोकांचे फार्महाऊस आहेत तेथील वॉचमन लोकांना माझा फोन नंबर दिला असून काहीही मदत लागल्यास फोन करावा असे सांगितले आहे. गावात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या महत्वाच्या घटना मी माझ्या नोंद वहीत लिहून ठेवल्या आहेत. तसेच पोलिस, महसूल आणि वनविभाग या तिन्हीही विभागासाठी काम करायला मिळते याचा आनंद वाटतो, असेही दत्ता पायगुडे सांगतात.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
किंमत – ३०० रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 93712 69949
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

