नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…

हैद्राबादः ओयो माजी नगरसेविकेसोबत नवऱ्याला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने मोठा गोंधळ घातला. केला. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा पतीदेखील नगरसेवक होता. तर, त्याची कथित प्रेमिका असलेली माजी नगरसेविका ही महिलांच्या प्रश्नासाठी स्थापन केलेल्या SHE पथकाची प्रमुख होती.

तेलंगणातील महबूबाबाद शहरात एका OYO हॉटेलमध्ये झालेल्या कौटुंबिक ‘हायवोल्टेज ड्राम्याने’ केवळ सोशल मीडियाच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळाला हादरवून टाकले आहे. बीआरएस (BRS) पक्षाचे माजी नगरसेवक गोगुला राजू हे आपल्या महिला मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती त्यांच्या पत्नीला मिळाल्यानंतर तिने स्वतः आपल्या काही कार्यकर्त्यांसह धडक देत पतीला रंगेहात पकडले. हॉटेलच्या रुममध्ये आपल्या पतीला एका परस्त्रीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने मोठा गोंधळ घातला.

गोगुला राजू आपल्या कथित प्रेयसीसोबत महबूबाबादमधील एका OYO हॉटेलमध्ये थांबले होते. त्याच वेळी अनुराधा आपल्या काही नातेवाईक व समर्थकांसह तिथे पोहोचल्या. त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना रूम उघडायला लावली, कॅमेरे ऑन केले आणि थेट दरवाज्यापाशी गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाला. हॉटेल रूममध्ये घुसून अनुराधा यांनी नवऱ्याच्या कानशिलात लगावली. “माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस?” असा जाबही त्यांनी विचारला. काही स्थानिक कार्यकर्त्यांनीही या गोंधळात सहभाग घेतला. त्यातील काहींनी माजी नगरसेवकावर आपला हात साफ करून घेतला. या प्रकरणामुळे एकेकाळी महिलांच्या सुरक्षेचे धडे देणाऱ्या माजी नगरसेविकेचीही प्रतिमा मलीन झाली आहे. संपूर्ण घटनेमुळे महबूबाबाद शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले आहे.

नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

बापाला कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडले अन् आईला, भावाला बोलावले…

Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…

प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद…

सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!