
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): बांदा येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवून व्हायरल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, महिला (वय ४०) आणि पुरुष (वय ५५) दोघांनाही लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली जात आहे. काही गुंड एका महिलेला शिवीगाळ करत लाथा मारत आहे. काही अंतरावर एक व्यक्ती असहाय्य अवस्थेत जमिनीवर बसलेली आहे, ज्याचे कपडेही हे गुंड त्याचवेळी काढत आहेत. त्या व्यक्तीला लाठ्या, कधी लाथा आणि थापड मारत आहे. पैलाणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील असून रामबालक निषाद असे मारहाण होणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे आढळून आले. रामबालक हा हमीरपूर जिल्ह्यातील भरुआ सुमेरपूरचा रहिवासी आहे. पैलाणीत ज्या ठिकाणी मारहाण होत होती ते सासरचे घर होते. हा व्हिडीओ 16 ऑक्टोबरला घडलेल्या घटनेचा आहे.
रामबालक निषाद याला गावातील एका महिलेशी अवैध संबंध असल्याच्या संशयावरून गावातील गुंडांनी बेदम मारहाण केली. त्याला बांदाच्या सीमेपलीकडील भरुआ सुमेरपूर भागात प्राणघातक जखमी अवस्थेत फेकण्यात आले, तेथून त्याचे कुटुंबीय त्याला कानपूरला घेऊन गेले आणि तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
बांदाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिवराज यांनी सांगितले की, रामबालक निषाद (वय ५५) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 16 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. घटनेनंतर रामबालक निषाद यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी कानपूरला नेले, तेथे त्यांचा मृत्यू झाला रामबालक निषादच्या कुटुंबीयांनी पैलाणी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा करणाऱ्या आरोपींची ओळख पटवली जात आहे.
55 की उम्र में नैन मट्टका करने का अंजाम,
प्रेमिका से मिलने पहुंचे प्रेमी को बंधक बनाकर दी तालिबानी सजा, उपचार के दौरान प्रेमी की मौत, वायरल वीडियो यूपी के बांदा जिले का।
वीडियो में गाली गलौज है एयरफोन लगाकर सुने। pic.twitter.com/rKar79oRWc
— Rohit Tripathi journalist (@rohitt_tripathi) October 27, 2024
धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..
धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…
खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…
दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…
महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…

