
पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली; अन्याय झाल्याची भावना…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांची तडकाफडकी बदली केल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय, कुमार घाडगे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी त्यांच्या विभागांमध्ये वाहतुकी संदर्भात फेरबदल केले. शिवाय, वाहतूक समस्या सोडवण्यामध्ये त्यांचा मोठे योगदान राहिले आहे. वाहतूक विभागांमध्ये ते अव्वल काम करत असल्याकारणाने महानगरपालिका अधिकारी यांच्याबरोबर सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार करून वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून अडीअडचणी ट्रॅफिक संदर्भातली माहिती देत असत. रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकामे होल्डिंग, टपऱ्या बेकायदेशीर पार्किंग असे विविध गोष्टींवर त्यांनी काम केले आहे. कोंढवा वाहतूक विभागात वाहूतक कोंडी सोडविण्याचे चांगले काम करत असतानाही त्यांची तडकाफडकी बदली केल्यामुळे पोलिस दलामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.
एखादा अधिकारी चांगले काम करत असतानाही अचानक बदली केल्यामुळे मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. आयक्यू गोष्टींवर लगेच तडकाफडकी निर्णय घेणे योग्य नाही आहे. प्रमाणिक अधिकारी जे मनापासून काम करतात व कामास प्राधान्य देतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भावना पोलिस दलामध्ये आहे.
दरम्यान, कोंढवा या भागातील वाहतुक व्यवस्था हि बिकट असल्याचे स्थानिक नागरीक यांनी कोंढवा विभागातील वाहतुक परिस्थीती सुधारण्याबाबत विनंती केली होती. कोंढवा वाहतुक विभागाचे हदीमध्ये मागील पाच महिण्यामध्ये हद्दीतील वाहतुक कोंडी कमी करण्याचे अनुषंगाने, खालील प्रायोगिक तत्वावर कामे करण्यात आल्याने वाहतुक कोंडी कमी झाली आहे.
१. सोमजी चौक :- सदर चौकामध्ये मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. त्या अनुषंगाने प्रायोगीक तत्वावर मुख्य रस्त्यावर सोमजी चौकात वाहतुकीस अडथळा होऊ नये या करीता सदर रोड हा लोखंडी बैरीकेट, लाकडी बांबू व दोरखंडच्या साहयाने ४४ मी बंद करून प्रत्येक मार्गावरील उजव्या बाजुस जाणास
निवर्ध घालुन त्यांना यु टर्न दिल्याने, चौकातील वाहतुक कोडी कमी झाली.
२. आंबेकर चौक :- काञज – कोंढवा- मंतरवाडी बायपास रोडवर आंबेकर चौक येथे जंगदम्बा भवन व एन. आय. बी. एम. रोड हे अरूंद असल्यामुळे तसेच या भागातील स्थानिक वाहतुक जास्त प्रमाणात असल्याने चौकामध्ये क्रॉसींग झाल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत होता. त्या अनुषंगाने प्रायोगीक तत्वावर मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होऊ नये या करीता सदर रोड हा ७० मी. बैरीकेट व बांबुच्या साहयाने बंद करून यु टर्न करीता आवश्यक असलेली जागा हि स्थानिक लोकांना विश्वासात घेवून संपादीत करून त्यावर डांबरीकरण करून घेतले. तसेच उजव्या व डाव्या बाजुस जाणास निबर्ध घालुन त्यांना यु टर्न दिल्याने, वाहतुक कोडी कमी झाली.
३. फकरी हिल चौक :- सदर चौकामध्ये साळुखे विहार, कोंढवा गावातुन, चौकाचे आजुबाजुस असणाऱ्या सोसायटीमधुन व पुणे शहरातुन येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे सकाळी व सायंकाळी सदर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. त्या अनुषंगाने प्रायोगीक तत्वावर वाहतुकीस अडथळा होऊ नये या करीता बॅरीकेट व बांबुच्या साहयाने ७५ मी. बंद करून वाहतुक डायव्हर्शन केल्याने वाहतुक कोडी कमी झाली आहे.
४. अशोका म्युझ चौक :- येथे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. त्या अनुषंगाने, स्थानिक दुकानदार व नागरिक यानां विश्वासात घेऊन प्रायोगीक तत्वावर मध्यभागी असलेले पंक्चर हे बॅरीकेट व बांबुच्या साह्याने बंद करून, यु टर्न घेवून वळविले. त्यामुळे सदर चौकामध्ये होत असलेली वाहतुक कोही कमी झाली.
5. ए.बी.सी. फाम :- साळुंखे विहार रोडवरील ए.बी.सी. फाम चौकामध्ये ११ नं. गल्लीमधुन चौकामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे चौक जाम होत होता. त्यावर उपाय म्हणुन सदर गल्ली नं. ११ मुख्य प्रवेशव्दार हे लोखंडी बैरीकेट व लाकडी बांबुच्या साह्याने बंद केल्यने चौकामधील जामींग पुर्ण कमी झाले.
६. कोंढवा वाहतुक विभागामध्ये मुख्य चौकामधील वाहतुकीस अडथळा ठरणारे शितल चौक, सोमजी चौक, अशोका म्युज चौक व उंड्री चौक येथील ०६ पी. एम. पी. एम. एल. चे बस स्टॉप हे चौकातून ठरावीक अंतरावर स्थालांतरीत केले.
७. कोंढवा वाहतुक विभागाचे हद्दीमध्ये वाहतुकीचे नियमन करताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांचेवर मोटार वाहन अधिनियम अन्वये कारवाई करण्यासाठी पोलिस अधिकारी अंमलदार यांना सुचना दिल्या जातात. यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणे, रॅश ड्रायव्हिंग, फॅन्सी नंबरप्लेट, राँग साईट व इतर कलमान्वये सन २०२४ मध्ये एकुण ३४,४७८ वाहनावर कारवाई करण्यात आली तसेच सन १ जाने २०२५ ते आजपर्यंत एकुण ५६४६ वाहनावर करवाई करण्यात आली आहे.
८. चालु वर्षामध्ये पारगेनगर भागातील स्थानिक नागरीकांचे मागणीनुसार नो पार्किंग, पार्कींग, पी. १ पी. २ चा प्रस्ताव पाठवुन नो पार्किंग, पार्किंग, पी. १ पी. २ करण्यात आले असुन सदर भागामध्ये पार्क करण्यात आलेल्या एकूण १४९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच १) एसेंशिया २ को ऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी, सर्वे नं. २४/१ ए/१, कोंढवा बुद्रक, पुणे २) गगन अव्हेन्यू को ऑप. हौसिंग सोसायटी (सर्वे नं. १७/३/१ ए, १७/३/३ ए, १७/३/३ ए) कोंढवा बुद्रुक, पुणे ३) फकरी हिल येथील स्थानिक नागरीक यांचे मागणीनुसार त्यांचे सोसायटी समोर नो पार्कींग करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास मंजुरीकरीता सादर करण्यात आले आहेत.
दरम्यान, कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे हे अधिकारी प्रमाणिकपणे व स्वतःहून काम करत असतानाही त्यांची तडकाफडकी कंट्रोलला नियुक्ती केल्यामुळे स्थानिक नागरिकांसह पोलिस दलातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पुणे शहरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…
Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…
Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…
Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

