इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू…

तेहरान (इराण) : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रीही अपघातात ठार झाले. अजरबैजानमधील घनदाट आणि पर्वतीय भागात रविवारी हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमधून इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्र्यांसह इतर अधिकारी जात होते.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टरचा समावेश होता, त्यापैकी दोन सुरक्षितपणे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणावर पोहोचले, परंतु एकासोबत अपघात घडला. इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) अंतरावर अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ ही घटना घडल्याचे स्टेट टीव्हीने म्हटले आहे.

अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी रायसी रविवारी पहाटे अझरबैजानमध्ये होते. आरस नदीवर दोन्ही देशांनी बांधलेले हे तिसरे धरण आहे. इराण देशात विविध प्रकारची हेलिकॉप्टर उडवली जातात, परंतु आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इस्लामिक देशाला या हेलिकॉप्टरचे सुटे भाग मिळणे कठीण झाले आहे. त्याचा लष्करी हवाई ताफा देखील 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वीचा आहे.

रईसी हे अजरबैझानमध्ये डॅमच्या उद्घाटनासाठी गेले होते. अजरबैझानचे इस्रायलसोबत इंटेलिजन्स कम्युनिकेशन आहे. दोघेही एकमेकांशी इंटेलिजन्स शेअर करतात. इराण आणि अजरबैझान हे दोन्ही शिया पंथीय देश आहेत. अजरबैझान बराचसा धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे दोन्ही देशात कटुतासुद्धा आहे. अजरबैजानची इस्रायलला खूपच मदत मिळाली आहे. अर्मेनियाशी लढाई झाली तेव्हा अजरबैझानच्या बाजूने इस्रायल उभा राहिले. इस्रायलचे इराणमध्ये हेरगिरीचे नेटवर्क पसरले असून त्यात अजरबैझानची मोठी भूमिका आहे. त्यामुळे हत्येच्या कटाची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!