
Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी परिरसरात गोळीबार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपींना पोलिसांनी २४ तासात अटक केली. शिवाय, ज्या परिसरात त्यांनी गोळीबार केला आहे. त्याच परिसरात नेऊन त्यांची वरात काढण्यात आली. पोलिसांनी उपस्थितांनाही मार्गदर्शन केले. नागरिकांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे आभार मानले आहेत.
दिनांक १८/०५/२०२५ रोजी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे मागे हनुमान मित्र मंडळ चौकामध्ये अप्पर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे व गणेश सुर्यवंशी यांनी अक्षय भालके यांचेविरुध्द डायल ११२ वर केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के व देवा डोलारे यांनी मिळून फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. बाळा गाडे याने त्याचेकडील पिस्टलने फिर्यादी यांचे दिशेने फायर करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के, अक्षय भालके व देवा डोलारे यांचेविरूध्द दिली असता बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. १०९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११५(२), १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३),१९०,आर्म अॅक्ट ३(२५),४(२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.”
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा.पोलिस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलिस निरीक्षक सुरज बेंद्रे (गुन्हे) यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे प्रभारी पोउनिरी अशोक येवले व अंमलदार यांना सुचना केले.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
दाखल गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील व चलाख वृत्तीचे गुन्हेगार असल्याने ते पोलिसांचे डावपेच ओळखून होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार प्रणय पाटील, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, विशाल जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अक्षय भालके, गणेश भालके हे चैत्रबन वसाहत येथे एका पडक्या घरामध्ये लपून बसले आहेत. त्यानुसार तपास पथकाने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्हे शाखा युनिट सहा.पोलिस निरीक्षक मदन कांबळे, व त्यांचे स्टाफ यांनी देवा डोलारे यास बोपदेव घाट येथून ताब्यात घेवून अटक केली असून पुढील तपास करत आहोत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर वानवडी पोलिस आयुक्त मनोज पाटील पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा.पोलिस आयुक्त, विभाग धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलिस निरीक्षक सुरज बेंद्रे साो.(गुन्हे), पोउनिरी अशोक येवले, पो.हवा.गायकवाड, पो.अं.प्रणय पाटील, सुमित ताकपेरे,आशिष गायकवाड, शिवाजी येवले, विशाल जाधव, ज्योतिष काळे, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, शिवाजी येवले यांनी केली आहे.
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
निलेश चव्हाण याचे कारनामे उघड; फॅन, एसीमध्ये spy कॅमेरा अन् आक्षेपार्ह्य व्हिडिओ…
राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
खुनाचा बदला! पुणे गुन्हे शाखा युनिट ०२ने आरोपीला पिस्टलसह घेतले ताब्यात…

