
चोर परदेशात अन् चोरी पुण्यात? आरोपीस सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात नोकरानी चोरी केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. सदर तक्रारीनुसार संबंधित चोर हा तक्रारदार यांच्याकडे कामाला होता. व्यापारी हा आपली पत्नी मुले व सुनांसोबत बाहेरगावी गेला असता चोराने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील रोख रक्कम रुपये 25 लाख व अंदाजे 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून फरार झाला.
व्यापारी जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिले की घरातील कपाट मोकळी होती व त्यातील रोख रक्कम व सोने गायब झाले होते. तसेच त्यांचा नोकर देखील गायब होता व त्याचा फोन लागत नव्हता. तेव्हा व्यापाऱ्याला खात्री पटली की चोरी त्याच्या नोकरानीच केलेली आहे. सदर तक्रारीवरून आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला गेला. दरम्यानच्या काळात आरोपीने स्वतःच्या अटकेपासून संरक्षणसाठी अॅडव्होकेट शिरीष पाटील यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.
आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट शिरीष पाटील यांनी कोर्टाच्या निदर्शनास गुन्ह्यातील सत्य बाजू लक्षात आणून देताना, फिर्यादीतील नमूद घटनेच्या दिवशी, आरोपी हा पुण्यामध्ये नसून परदेशात होता, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्या संदर्भात पासपोर्ट वरील नोंदी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सदर बाबी लक्षात घेता तपासी अधिकारी यांना पासपोर्ट विभागाशी संपर्क साधून पासपोर्ट नोंदी बाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले असता पोलिस तपासात असे लक्षात आले की, फिर्यादी मध्ये नमूद घटना घडली त्यादिवशी आरोपी हा देशाबाहेर होता. पोलिसांनी तक्रारदार यांचा पुरवणी जबाब नोंदवून घटना ही आधीच घडली आहे, असे लेखी स्वरूपात न्यायालयासमोर सादर केले.
पोलिसांच्या सदरच्या पुरवणी जबाबास अॅडव्होकेट शिरीष पाटील यांनी जोरदार विरोध करत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, तक्रारदार यांनी त्यांच्या वैयक्तिक द्वेषातून आरोपीला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवले आहे व आरोपी हा देशाबाहेर असताना पोलिसांच्या मदतीने आरोपीला त्रास देण्यासाठी हा खोटा पुरवणी जबाब सादर केला आहे, त्यामुळे तो अटकपूर्व जामीन देताना ग्राह्य धरता येणार नाही. तसेच तक्रारदार व पोलिस हे न्यायालयाची दिशाभूल करीत आहेत, हे लक्षात आणून दिले. अॅडव्होकेट शिरीष पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सदर गुन्ह्यात आरोपीला माननीय न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपी खोट्या गुन्ह्यात अटक होण्यापासून वाचला. सदर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अॅड शिरिष पाटील व अॅड अमोल जगताप यांनी आरोपीच्या वतीने बाजू मांडली.
गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
न्यायालयात थुंकताना न्यायाधीशांनी पाहिले अन् तात्काळ…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

