
मुख्याध्यापिकेवर २७ वार करत विद्यार्थ्याने संपवलं; बाबू शब्दामुळे अडकला…
हैदराबाद: एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दोघांपैकी एका विद्यार्थ्याला रुपा यांनी चोरी करताना पकडले होते. त्यानंतर त्यानं आपल्या मित्राला हाताशी धरून रुपा यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे.
रुपा यांचे शव ११ ऑगस्टला घरात मिळाले होते. त्यांच्यावर चाकूनं २७ वार करण्यात आले होते. रुपा यांनी शेवटचा कॉल त्यांच्या मावशीला केला होता. कॉल कट करण्यापूर्वी मावशी सोबत बोलताना रुपा यांनी ‘बाबू’ शब्दाचा वापर केला होता. याच शब्दाच्या जोरावर पोलिसांनी प्रकरणाची उकल केली. बाबू शब्दाचा वापर साधारणपणे विद्यार्थ्यांना हाक मारताना केला जातो. त्यामुळे यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची भूमिका असावी, असा संशय पोलिसांना आला. यानंतर पोलिसांनी रुपा यांच्या परिचयाच्या लोकांची चौकशी केली. यामध्ये शाळकरी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
View this post on Instagram
नलगोंडाचे पोलीस अधीक्षक शरतचंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात विद्यार्थ्यांकडे संशयाची सुई होती. दहावीत शिकणारे २ विद्यार्थी अचानक खूप पैसे खर्च करू लागल्याचं, मित्रांसोबत पार्ट्या करू लागल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्याबद्दलचा संशय वाढला. बुधवारी सकाळी दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांपैकी एका विद्यार्थ्याकडे पोलिसांना १.५१ लाख रुपये, एक आयफोन सापडला. हे पैसे आई, वडिलांनी दिल्याचा दावा त्यानं सुरुवातीला केला. यानंतर पोलिसांनी रोख रक्कमेची फॉरेन्सिक चाचणी केली. तेव्हा पैशांवर मानवी रक्ताचे डाग आढळले. दोन्ही विद्यार्थ्यांना मद्यपानाचे व्यसन आहे. यापैकी एकाला दुचाकी आणि कार चालवण्याचा छंद आहे. त्याला कमी वेळात जास्त पैसा कमवायचा होता.
रुपा यांच्या हत्येच्या १५ दिवस आधी हा विद्यार्थी रुपा यांच्या नजरेत आला होता. मुख्याध्यापिका असलेल्या रुपा आणि शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याच्या दप्तरात मोबाईल आणि रोकड पाहिली होती. त्यामुळे रुपा यांनी त्याला हॉस्टेलमधून काढले होते. त्याला केवळ सामान्य वर्गात बसण्याच्या सूचना केल्या. त्याच्या आई-वडिलांनादेखील त्याच्या वर्तणुकीची कल्पना देण्यात आली होती. ११ ऑगस्टला विद्यार्थ्यांकडून शाळेची फी भरली जात होती. त्यामुळे ११ तारखेला रुपा यांच्या घरात बरीच रोकड असेल, असा विचार आरोपी विद्यार्थ्यानं केला. पाच दिवसांपूर्वीच हत्येची योजना आखण्यात आली. त्यासाठी दोघांनी चाकू आणि ग्लव्ह्ज खरेदी केले. परिसराची रेकी केली. सीसीटीव्ही नेमके कुठे आहेत, तेदेखील पाहून ठेवण्यात होते. रुपा यांची हत्या केली. परंतु, पोलिसांच्या नजेरमधून त्यांची सुटका होऊ शकली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…
प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची अत्याचार करून क्रूरपणे हत्या…
मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

