
पुणे शहरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त यांनी एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ओम विजय पाटील (वय २३, रा.लोकमान्य विहार सोसायटी रुम नं ८८, डी.पी रोड औंध पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी व सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०२ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगार ओम विजय पाटील विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये बुलढाणा कारागृह, बुलढाणा येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. १).जा क्र/ क्राईम/ पी.सी.बी/ डिईटी / चतुःश्रृंगी/पाटील/४६६/२०२५
दि.२६/०५/२०२५ अन्वये २) जाक्र/क्राईम / पीसीबी/डिईटी/चतुःश्रृंगी/पाटील/रवानगीआदेश ४६७/२०२५ दि. २६/०५/२०२५ अन्वये महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडिओ पायरेटस) यांचे विघातककृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, सन १९८१ (१९८१सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५५) (सुधारणा १९९६) ( सुधारणा २००९)(सुधारणा २०१५) कलम ३ (२) प्रमाणे सदर आरोपीस बुलढाणा कारागृह, बुलढाणा येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, हिम्मत जाधव, पोलिस उप आयुक्त परिमंडळ- ४ पुणे शहर, विठ्ठल दबडे, सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, वपोनि विजयानंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अश्विनी ननवरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), नरेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, दत्तात्रय येळे, पोलिस उपनिरीक्षक, पोहवा १३४ दांगडे, पोहवा २२०४ वाघवले, पोहवा ११७८ मोमीन, पोशि ९०४९ पालांडे, पोशि ३९०२ ठोसर, मपोशि ९२४८ कुंभार सर्व नेमणुक चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…
पिंपरी-चिंचवड शहरातील ४७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…
Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…
मोठा आरोप! वाल्मीक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला…

