Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…

कराची (पाकिस्तान): जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील (POK) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही ठार मारण्यात आले. दहशतवादी मसूद अझहर याला पश्चाताप झाला असून, त्याने एक पत्रक जारी करून म्हटलंय की, ‘भारताच्या हल्ल्यात मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं. तसेच, भारत आता कुणाची दया करणार नाही.’

कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा केला आहे. हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.

पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीणही ठार झाली आहे. या हल्ल्यांमध्ये घोषित दहशतवाद्यांचे नातेवाईकही मारले गेले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला.

जैश-ए-मोहम्मदनं एक पत्रक जारी करून म्हटले की, मौलाना मसूद अझहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब मारलं गेले आहे. मुफ्ती अब्दुल रौफ यांची नातवंडं, बाजी सादियाचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुलं जखमी झाली आहेत. कुटुंबातील बहुतेक महिला आणि मुलं मारली गेली आहेत. अझहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारी देखील भारतीय हल्ल्यात मारले गेले आहेत.

मसूद अझहर यानं पत्रकात म्हटले की, अल्लाह तआलाचे काही खास लोक असतात… जे शहीद होतात, ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्या कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली… रात्रीच्या वेळी त्यांना ही शहादत मिळाली. पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती सगळे या अपघातात शहीद झाले.

माझ्या आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, “माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वडिलांजवळ दफन करा.” आणि आश्चर्य म्हणजे ती आपल्या पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं.

एका अनुभवी माणसाने सांगितलं की, “हे निष्पाप मुलं, आई-वडील, बुजुर्ग लोक – हे सगळे खास होते. त्यांचा मृत्यू अचानक झाला पण त्यांच्या नशिबात हे लिहिलं होतं. त्यांचं शहिद होणं ही मोठी गोष्ट आहे. अल्लाहने त्यांना आपले पाहुणे बनवले.” हे “चौधरी” नावाचं कुटुंब तीन वर्षांपासून हजला जायचा प्रयत्न करत होतं. व्हिसा मिळत नव्हता. पण यावेळी त्यांना व्हिसा मिळाला आणि संपूर्ण कुटुंब हजसाठी गेलं. आणि अल्लाहच्या घरात पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. अशी वेळ खूप कमी लोकांच्या नशिबात येते.

“मोत्वी” नावाच्या व्यक्तीने सांगितलं की, हा अपघात, हे बलिदान संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आहे. शहीद झालेल्यांचा त्याग, त्यांचं बलिदान हे सगळं इतिहासात कायम राहणार आहे. आज त्यांच्या जनाजाची (अंत्यविधीची) नमाज हरम शरीफमध्ये होणार आहे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ईमान, पश्चात्ताप आणि माफी मागण्याची अशी संधी फार थोड्यांना मिळते…

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर

3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी

5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर

6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर

8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर

9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

दरम्यान, भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक आणि मर्यादित हल्ले केले. ही कारवाई पूर्णपणे गैर-प्रक्षोभक होती आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले गेले नाही. हल्ले त्या ठिकाणी झाले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. सैन्याच्या एक्स (X) हँडलनुसार, हे ऑपरेशन केवळ 23 मिनिटांत पार पडले. पहाटे 1:28 ते 1:51 दरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाले. अखेर सैन्याने 1:51 वाजता पुष्टी केली की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ‘न्याय झाला.’

Operation Sindoor Time Line :
1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले: #PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…

Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…

Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!