
प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…
पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका युवकाने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलले असून, लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे, त्याचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीमध्ये आढळला आहे. सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवलेला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशनच्या माध्यमातून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन तो बाहेर काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत प्रजापती याचे चाकणमधील युवतीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्याल्या प्रेयसीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. याच संशयाच्या नैराश्यात असलेला सूर्यकांतने 9 ऑक्टोबर आपले घर सोडले. त्यानंतर तो घरी आला नाही. चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
सूर्यकांत प्रजापती हा 9 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेला होता, व त्याने थेट लोणावळा गाठले, पोलिसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून शोध घेतला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे वाघजाई दरी परिसर आढळून आले होते, त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू असताना सूर्यकांत प्रजापती याचा मृतदेह हा लोणावळा शहर पोलीस खोपोलीतील अपघातग्रस्तांची संस्था तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमला सापडला. या शोध मोहीमेदरम्यान या मुलाचे नातेवाईक, लोणावळा पोलीस, अपघातग्रस्त मदतीची संस्था आणि शिवदुर्ग रेस्कु टीमचे सदस्य हजर होते. प्रेमात नैराश्य आल्याने सूर्यकांत प्रजापती याने चाकण वरून येऊन लोणावळ्यात आत्महत्या केली.
राजमाची दरीत तब्बल 370 फुटांवर तरूणाचा मृतदेह आढळून आला. सात दिवसांनंतर सूर्यकांतचा शोध लागला. प्रेम प्रकरणातून सूर्यकांत याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवदुर्गचे सुनील गायकवाड यांच्या पथकाने त्याचा मृतदेह शोधला आहे.
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…
पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

