पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

लाहोर (पाकिस्तान): भारत-पाकिस्तामध्ये आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. भारतापुढे निभाव लागत नसल्यामुळे सैनिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पाकिस्तानी लष्करातील एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन नेहमीप्रमाणे पाकिस्तानशी जोडले असल्याची बाब समोर आली होती. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर पाकिस्तानकडूनही सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु झाली होती. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल, अशी जोरदार चर्चा आहे. युद्धाचे हे ढग दाटले असताना पाकिस्तानी लष्करात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी सैन्यदलात अधिकारी आणि सैनिक मोठ्याप्रमाणावर राजीनामे देऊ लागले आहेत.

पाकिस्तानच्या 11व्या कोअरचे प्रमुख ओमर अहमद बोकारी यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पत्र लिहले आहे. हे गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 12 क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प मांगला रिजन, नॉर्दन कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. फर्स्ट कॉर्प मांगला रिजनमध्ये तर 50 अधिकारी आणि 500 सैनिकांनी लष्करी सेवेतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सगळ्यांनी वैयक्तिक कारण, कामाचा वाढलेला तणाव आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीबाबत सरकारकडे नसलेले ठोस धोरण या बाबींचा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने युद्धाच्या परिस्थितीत कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा सैनिकाने राजीनामा देऊ नये, अशी तंबी देऊन ही पडझड तुर्तास थांबवल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी मागणी लष्करप्रमुखांकडे करण्यात आली आहे.’

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1948, 1965, 1971 आणि 1999 अशी चार युद्ध झाली. या चारही युद्धांमध्ये पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय, अनेक सैनिक मारले गेले. त्यामुळे आता पुन्हा युद्ध झाल्यास भारतीय लष्कराच्या संभाव्य संहाराची भीती अनेकांना वाटत असावी. त्यामुळे पाकिस्तानमधील बडे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांची कुटुंब देशातून पळ काढत आहेत. अलीकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राजकीय नेते बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबाने पाकिस्तान सोडून परदेशात पळ काढला होता.

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!