
Pahalgam Terror Attack! बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन होते सक्रिय…
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला अधिक वेग प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय हे मोबाईल फोन तस्करी करुन आणले होते, असेही तपासात पुढे आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हल्याच्यावेळी बैसरन व्हॅली या ठिकाणी सक्रिय असलेल्या मोबाइलचा डंप डाटा काढला जात आहे. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांचा मोबाइल हिसकावल्याचे ही तपास यंत्रणेच्या तपासात समोर आली आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्षदर्शी जखमी यांचेही जबाब NIA कडून नोंदवले जात आहेत. घटनास्थळी सापडलेली रिकामी काडतूसं न्यायवैदक प्रयोगशाळेला पाठवली असून बॅलिस्टिक तपासणीतून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा प्रकार उघडकीस येऊ शकतो.
27-28 एप्रिल 2025 च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला होता. याला भारतीय सैन्यानेही जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. निवेदन सादर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

