
नाशिक! नवविवाहित दाम्पत्याचा अंत्यविधीसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर रविवारी (ता. २६) मोटार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दिनेश गावित आणि त्यांची पत्नी कीर्ती गावित हे दोघे त्रिशा गावित हिच्यासह दुचाकीवरून प्रतापपूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. पिळकोस फाट्याजवळ आले असता एका भरधाव मॅक्स गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.
View this post on Instagram
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवदाम्पत्याचा मृत्यू झाला. त्रिशा गावित यांच्यावर सध्या नाशिक येथे वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दिनेश आणि कीर्ती यांचा विवाह अवघ्या मे महिन्यात पार पडला होता. काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद कळवण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…
नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…
नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…

