
हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…
यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मुलगी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वागद (इजारा, जि. यवतमाळ) येथे घडली आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. यूपीएससीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारे यांच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण खंदारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
मुलगी आयएएस (IAS) अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते. मोहिनी हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करून आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण खंदारे कुटुंबाने गावात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, कार्यक्रमादरम्यानच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी महागाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुलीच्या यशाचा आनंद साजरा करायचा असताना तिच्या वडिलांच्या निधनामुळे सगळं वातावरण गहिवरून गेले. प्रल्हाद खंदारे यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि नव्याने आयएएस झालेली मुलगी मोहिनी असा परिवार आहे. दरम्यान, मोहिनी खंदारे हिने पुण्यात कोचिंग क्लासेस करत आपल्या अभ्यासावर भर देत हे यश मिळवले आहे. याआधी 2021 मध्ये एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाली होती.
प्रेरणादायी संघर्षगाथा! कोल्हापूरच्या माळरानात मेंढरं राखून बिरदेव झाला IPS…
मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…
हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…
हृदयद्रावक! प्रेमविवाहाच्या साखरपुड्याला पाहुणे आले अन् अंत्ययात्रेला जावे लागले…
हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…

