
हृदयद्रावक! विहिरीत बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू…
लातूर: एका विहिरी जवळ खेळत असताना अचानक विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुईकोट किल्ल्याजवळील ताले बुरहान (ता. औसा, जि. लातूर) परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अलीना समीर शेख (वय 5) आणि उस्मान समीर शेख (वय 3) अशी मृ्त्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे बहिण आणि भाऊ गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास खेळत खेळत घराबाहेर आले आणि खेळताना अचानक विहिरीत पडले. या दोन्ही बालकांचे पालक मजुरी करुन आपली उपजिविका भागवतात. गुरुवारी दुपारी दोन्ही मुलं घरात दिसत नसल्याने पालक शोध घेत होते. परंतु त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेरीस शेजारी असलेल्या विहीरीत काटेरी फांद्याच्या सहाय्याने शोध घेतला असता दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, चिमुकल्यांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्यात बुडून ठार मारले; कारण…

