बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…

बीड : सासऱ्याने जुन्या काळात जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने जातपंचायतीने सासऱ्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला व जातीतून बहिष्कृत केले. हा थकीत दंड आता त्यांचा मुलगा व सुनेने भरावा, असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. पण, दंड भरण्यास मुलगा व सुनेने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांना व त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांना जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय जातपंचायतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी ८ जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

आष्टी तालुक्यातील कडा साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या मालन फुलमाळी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्या पती, दोन मुले व एका मुलीसह कडा कारखाना येथे वास्तव्यास आहेत. त्या नंदीवाले तिरमली या जातीच्या आहेत. त्यांच्या सासऱ्यांनी जातीतच प्रेमविवाह केला होता. मात्र, जातपंचायतीने या विवाहावर आक्षेप घेतला व त्यांच्या सासऱ्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तो दंड सासऱ्यांनी भरलेला नव्हता. त्यामुळे त्यांना जातीतून बहिष्कृत केले होते.

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी डोईठाण येथे जातपंचायत भरली होती. या वेळी मालन फुलमाळी यांना पंचायतीने बोलावून घेत हा थकीत दंड भरण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी दंड भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर जातपंचायतीने मालन यांच्या कुटुंबीयांना व पुढच्या सात पिढ्यांना जातीतून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी जातीचे पंच गंगाधर पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा), उत्तम फुलमाळी (रा. जेऊर ता. नेवासा), गंगा फुलमाळी (रा. पाटसरा, ता. आष्टी), चिभू फुलमाळी (रा. डोईठाण, ता. आष्टी), सुभाष फुलमाळी (रा. शनी शिंगणापूर), बाबुराव फुलमाळी (रा. निमगाव, ता. कर्जत), शेटीबा काकडे (रा. वाळकी), सयाजी फुलमाळी (रा. पिंपळनेर ता. बीड), गुलाब पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले…

अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!