हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…

यवतमाळ : यवतमाळच्या डोंगरखर्डा येथे पाहुणे बनून आलेले दोन मावस भावांचा धुळवडीच्या दिवशी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृत भावांची नावे आहेत. दोघे जण इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. आठ पैकी पाच जण अचानक पाण्यात बुडू लागले. इतर तीन जणांनी स्वत:ला वाचवलं. पण दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या डोंगरखर्डा येथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर ही घटना घडली आहे.

दोघे मावस भाऊ हे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दोघांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. याबाबतचा पुढील तपास कळंब पोलिस करीत आहेत.

हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…

भंडारदरा धरणात बुडून युवकाचा मृत्यू…

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!