
चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; परप्रांतीयांना ठोकल्या बेड्या…
पुणे (संदिप कद्रे): चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी करत गांजा विक्री करणा-या परप्रांतीयांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
चंदननगर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंदननगर पोलिस स्टेशन हद्दीत गुरुवारी (ता. १) पेट्रोलिंग करत होते. पोलिस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन जण नागपाल रोड, चंदननगर पुणे येथे गांजा विकणेसाठी येणार आहे. सदरची बातमी त्यांनी वरीष्ठांना कळवून वरीष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कारवाई करणेकरीता टिम रवाना झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आडबाजूस थांबून पाहणी केली. सायंकाळचे सुमारास बातमीतील वर्णनाचे इसम सदर ठिकाणी दिसून आल्याने पोलिस स्टाफने त्यांना जागीच
पकडले.
१) सागर कुमार सन ऑफ मिरजा शंकर (वय – २३ वर्षे, रा-ग्राम गोरीडी, पोस्ट- खमरीया, तहसील- औराई, जिल्हा – संत बिदास नगर भदोई, राज्य उत्तर प्रदेश), २) शिवम सरोज सन ऑफ मिरजा शंकर (वय – २२ वर्षे, रा- सदर) असे दोन्ही आरोपींची नावे आहे. सागर कुमार याचे ताब्यातील प्रवासी सॅकबॅग तपासली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसल्याने त्यांना पुढील कारवाई कामी चंदननगर पोलिस स्टेशनला आणून त्यांचे विरूद्ध चंदननगर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ६५/२०२४, एन.डी..पि.एस. अॅक्ट ८ (क), २०(ब), २९ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे. त्यांचेकडे एकुण पावणेतीन किलो गांजासह मोबाईल व इतर असा एकुण ६९,४००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलिस उप आयुक्त परि. ४ विजयकुमार मगर, सहा. पोलिस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मनिषा पाटील, वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंदननगर पो.स्टे पुणे शहर, सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत माने, पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलिस अंमलदार महेश नाणेकर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, विष्णु गोणे, सचिन कुटे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, शेखर शिंदे यांनी केले आहे.
चंदननगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईतास केली अटक…
चंदननगर पोलिसांनी २५० सीसीटीव्ही तपासून आरोपीस केली अटक…
पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…
पुणे शहरात बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

