Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

ठाणे : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून, २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखे होत असल्याचे सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आहे. आरोपी अक्षय शिंदे याने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जात आहे. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विनानुदानित आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200 च्या आसपास आहे.

आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याचे वय 24 वर्षे आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे 14 ऑगस्ट रोजी उजेडात आले आहे.

आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल, तर पोलिसांवर कारवाई होईल. या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी केलेल्या या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि हेड कॉन्सटेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला आहेत.

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!