हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह…

धाराशिव : यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील एकलव्य आश्रम शाळेत इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्कार राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या झाला असून आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात तुळजापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे तुळजापूर पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मुलाच्या आईने हंबरडाच फोडला असून, चौकशीची मागणी केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!