भावनिक पोस्ट! आईची शेवटची आठवण आहे; चोराला केली नम्र विनंती…

पुणे : एका युवकाची दुचाकी चोरीला गेली असून, ती त्याच्या आईची शेवटची आठवण होती. सोशल मीडियावर युवकाने भावनिक पोस्ट केली असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

दुचाकी चोरीला गेल्याचे कळताच युवकाने चोराला भावनिक आवाहन करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘दसऱ्याच्या दिवशी माझी काळी ॲक्टिव्हा गाडी चोरीला गेली. ती माझ्या आईची गाडी होती. आई आता या जगात नाही. त्यामुळे माझ्याकडे असलेली आईची ती शेवटची आठवण आहे. ती शोधण्यास मला मदत करा. ज्याने माझी ॲक्टिव्हा चोरली आहे त्याने ही पोस्ट पाहिली तर प्लीज माझी गाडी मला परत करा,’ असे युवकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अभय चौगुले असे या युवकाचे नाव आहे. दसऱ्याच्या दिवशी कोथरुडमधील शिवाजी पुतळ्याच्या परिसरातून त्याची काळ्या रंगाची ॲक्टिव्हा चोरीला गेली. आसपासच्या भागात खूप शोधूनही अभयला त्याची ॲक्टिव्हा सापडली नाही. त्यामुळे त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर दुःखी झालेल्या अभयने इन्स्टाग्रामवर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. इन्स्टाग्रामवरील अभयची भावनिक पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…

पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

Video : मुलाच्या हातातून मोबाईल घेतला अन् त्याने आईच्या डोक्यात घातली बॅट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!