दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…

भरतपूर (राजस्थान): भरतपूरमध्ये रुपवास पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 8 वर्षांच्या मुलाची दीड वर्षांपूर्वी हत्या झाली होती. संबंधित प्रकरणाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिराच्या प्रेमात वेडी झालेल्या आईनेच चिमुकल्याची केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 8 वर्षांच्या मुलाच्या हत्येची घटना चंदनपुरा गावात घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी कृष्णकांत उर्फ कृष्णा आणि त्याची प्रेयसी हेमलता हिला अटक केली आहे. नात्याने दोघेही वहिणी आणि दीर आहेत. दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले होते. या महिलेच्या मुलाने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. आपला मुलगा बाहेर कुठे तरी सांगेल. आपलं कृत्य हे कुटुंबातील लोक आणि समाजात समोर येईल अशी भीती दोघांना होती. त्यामुळे दोघांनी मिळून 8 वर्षांच्या मुलाला संपवण्याचा कट रचला. बाहेर फिरवण्यासाठी घेऊ जाण्याच्या बहाण्याने मुलाचा शेतात नेऊन खून केला. चिमुकल्याचा खून केल्यानंतर मृतदेह शेतात गाडून दोघे घरी आले होते.

मृत मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तब्बल दीड वर्ष हा तपास सुरू होता. पण पोलिसांकडून कोणताच तपास होत नसल्यामुळे वडिलांनी तपास करणारे पोलीस अधिकारी बदलावे अशी मागणी केली होती. त्यानंतर नव्याने आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि प्रकरणाचे धागेदोरे हे घरापर्यंत पोहोचले. पोलिसांनी जेव्हा आरोपी महिला आणि दिराची उलटतपासणी केली तेव्हा दोघांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!