
धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…
नाशिकः मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शहा कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शहा दाम्पत्याने विष सेवन आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शाह दाम्पत्याने आपल्या मुलासोबत काल रात्री जेवण केले. यानंतर पती आणि पत्नीने विष सेवन केले. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने शहा कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचे समजकाच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…
नाशिक जिल्ह्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या अत्याचार…
हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…

