पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पती-पत्नीमध्ये काल मध्यरात्रीनंतर भांडण झाले होते, तेव्हा तिथे आणखी एक व्यक्ती उपस्थित होता? आणि तोच व्यक्ती आरोपी पत्नी चैताली हिच्या संपर्कात होता, त्यामुळे उपस्थित असलेली तिसरी व्यक्ती नेमकी कोण? आणि त्या व्यक्तीचा नकुल भाईर यांच्या खुनाशी काही संबंध आहे का? याची पोलिस चौकशी करणार आहे.

नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यामध्ये संशयावरून भांडण झाले होते. रागाच्या भरात चैताली हिने पती नकुल भोईर यांचा कपड्याने गळा आवळून निर्घृण खून केला. या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी पत्नी चैताली हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, चैताली हिच्या संपर्कात असलेला हा तिसरा व्यक्ती कोण? याचा पोलिस शोध घेत असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, यासाठी नकुल यांनी मोठी तयारी केली होती. पत्नीला नगरसेवक बनवायचं होते. त्याच पत्नीने नकुल यांची हत्या केली आहे. नकुल भाईर हे परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याची मध्यरात्री अचानक हत्या झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…

पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…

पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक…

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!