धक्कादायक! घटस्फोटीत जावयाने पत्नीवरचा राग काढला सासूवर; टेम्पोत बसवले अन् पुढे…

मुंबई: एका व्यक्तीने सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून देत तिची हत्या केली आहे. पोलिसांनी तपासावेळी जावई आणि सासूमधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. बाबी दाजी उसरे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा अटनकर (वय 59) हा बाबी उसरे यांचा जावई होता. कृष्णा अटनकर आणि बाबी उसरे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. कृष्णा अटनकर आणि त्यांच्या पत्नीची अनेकदा भांडणे व्हायची. याला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. या दोघांचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यासाठी आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा राग कृष्णा यांच्या मनात होता.

कृष्णा हा ड्रायव्हर होता. घटस्फोट झाल्यानंतर पत्नी मुलुंड येथील आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती. ती आपल्या 20 वर्षांच्या मुलासोबत तिकडे राहत होती. कृष्णा अनेकदा त्यांना भेटायला मुलुंडला जायचा. यावरुन कृष्णा आणि बाबी उसरे यांच्यात वाद झाला होता. तो सोमवारी सकाळी आठ वाजता बाबी उसरे यांच्या घरी गेला होता. बाबी उसरे यांना रुग्णालयात तपासणीसाठी जायचे असल्याने कृष्णा त्यांना आपल्या मिनी टेम्पोतून घेऊन निघाला होता. बाबी उसरे टेम्पोच्या मागच्या भागात बसल्यानंतर कृष्णाने टेम्पोचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर कृष्णाने अचानक हातोडी काढून बाबी उसरे यांच्या डोक्यावर तीन-चारवेळा मारले. त्यामुळे बाबी उसरे बेशुद्ध पडल्या. ही संधी साधून कृष्णा अटनकर याने बाबी यांच्या अंगावर पेट्रोल आणि थिनर ओतून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर कृष्णाने स्वत:च्या अंगावरही पेट्रोल आणि थिनर ओतून घेत आत्महत्या केली. या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला टेम्पोतून आगीच्या ज्वाळा बाहेर निघत असल्याचे दिसले. त्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून टेम्पोचे दार उघडले तेव्हा आतमध्ये हातोडी, रॉकेलची बाटली, लायटर आणि बाबी व कृष्णा यांचे मृतदेह आढळले होते.

या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. बाबी उसरे आणि कृष्णा अटनकर या दोघांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले होते. मात्र, चौकशीनंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमात वाढ केली आहे.

सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…

सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…

प्रियकर अंधारात चुकून घुसला प्रेयीसीच्या जावेच्या पांघुरणात मग पुढे…

धक्कादायक! जावयाने सासूचे हात-पाय बांधून घात केला…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!