डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनिषा महेश मुसळे-माने हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून मनिषा माने विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर 25 मे रोजी न्यायालयाने मनिषाला जामीन मंजूर केला आहे. सदर गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरिता मनीषाने न्यायालयात अर्ज केला आहे.

मनीषा माने हिने डॉ. शिरीष वळसंगकर, डॉ. उमा वळसंगकर आणि इतर दोघांना ईमेल पाठवला होता. सदर ई-मेलमध्ये मनिषाने डॉक्टरांवर नको ते आरोप केल्यामुळे डॉ. शिरीष हे व्यथित झाले होते. त्यानंतर मनिषाने डॉक्टरांना लेखी माफीनामा लिहून दिला होता, लेखी माफीनामा लिहून दिला तरी मनिषाने ती तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे धमकी दिली होती, त्यामुळे 18 एप्रिल रोजी डॉ. शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आणि आत्महत्येस मनिषा ही जबाबदार आहे अशा आशयाची फिर्याद डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मनिषा हिस अटक केली होती. मनीषा मुसळे-माने हिने ॲड. प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत सदर गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरिता खालील मुद्द्यांवर अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, सबंध दोषारोपपत्रातील आरोपांचे व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मनीषा हिने डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असे कोठेही दिसून येत नाही. मनीषा हिच्या कृत्यामुळे डॉक्टरांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता, असे कोठंही दिसून येत नाही. डॉक्टरांचे आत्महत्येचा आणि मनीषावर असलेल्या आरोपांचा थेट संबंध दिसून येत नाही, या प्रमुख मुद्द्यांवर न्यायालयात मनीषा हिने प्रस्तुत गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला आहे. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे येण्याकरीता 26 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…

पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…

छावा संघटनेच्या नेत्याला प्रेयसीने भेटायला बोलवलं अन् चिरला गळा…

धक्कादायक! डॉक्टर जावयाने सासूचा खून करून मृतदेहाचे केले १९ तुकडे; कारण…

प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!