धुळे जिल्ह्यात दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी…
धुळे : धुळे जिल्ह्यातील सांगवी (शिरपूर) येथे गुरुवारी (ता. 10) सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून, इतरांचा शोध घेत आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी सांगवी गावात रुट मार्च काढला.
सांगवीत दोन गटात वाद निर्माण झाला होता. जाब विचारण्यासाठी एक गट गेला, त्यांना मारहाण झाली. त्यानंतर सांगवी, सारणपाडा या दोन गावांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेत दगडफेक झाली, यामध्ये गाड्यांचं मोठे नुकसान झाले. तर 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक जखमी झाले. या दगडफेकीतील जखमी 15 पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस तपास करत आहेत. दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरु झाले आहे.
दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी रुट मार्च काढला आहे. गावातील सर्व व्यवहार बंद आहे. दुकाने बंद असून संचारबंदीसारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पोलिसांकडून रुट मार्च काढण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दल आणि एसआरपीएफचा संयुक्त बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बीड पोलिसांकडून शांततेचे आवाहन; अफवा पसरवू नका…
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…