
अंबड पोलिसांची सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई…
नाशिक: अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई केली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त परिमंडळ – २ मोनिका राउत, सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र झोपडपटटीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतअधिनियम सन १९८१ चे कलम ३ (१) अनुसार” स्थानबध्दतेची कारवाई त्यांचेवर करणे बाबत अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.
अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाईचे करण्याचे धोरण केले असून त्याचा गुन्हेगारी वर परिणाम झालेला दिसुन येत आहे. प्रशिक अशोक अडांगळे यास पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश जारी करून अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलिप ठाकुर यांना त्याचा शोध घेवून त्यास स्थानबध्द करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरीक्षक नाईद शेख, पोना / २०९८ परदेशी, पोशि २६९७ प्रविण राठोड, पोशि २००३ अनिल गाढवे, पोशि/२५४७ शिंदे, पोशि/ २३४६ मते, पोशि २३९१ संदिप भुरे यांनी प्रशिक अशोक अडांगळे (वय २६, रा रूम नं ४ जोगेश्वरी अर्पाटमेंट, अभियंतानगर, कामटवाडा, सिडको, नाशिक) यास गोपनिय बातमीचे आधारे त्याचे राहते घरातुन ताब्यात घेण्यात आले. त्यास १४/०२/२०२४ रोजी पासुन नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यातच सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात आली असुन अंबड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे धोरण हाती घेतल्याने अंबड पोलिसांच्या या उत्कृष्ठ कामगिरी बदद्ल नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे,
संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उप आयुक्त मोनिका राउत, परिमंडळ – ०२, सहा पोलिस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर व क्राईम पोलिस निरीक्षक अशोक नजन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि नाईद शेख, पोना २०९८ पवन परदेशी, पोशि ९३० राउत, पोशि २०५४ करंजे, पोशि २५४७ समाधान शिंदे, पोशि २३९१ संदिप भुरे, पोशि २००३ अनिल गाढवे, पोशि १५६६ सागर जाधव, पोशि २२२९ घनश्याम भोये, पोशि २३४६ तुषार मते, पोशि २६९७ राठोड, पोशि २०९३ राकेश पाटील, पोशि / १९४३ निकम यांनी केली आहे. यापुढे देखील सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत करण्यात येईल याची माहिती अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी दिली.
Video: नाशिकमध्ये ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप!
नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…
नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…
नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

