पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पुणे: आयटी अभियंता सौरभ नंदलाल पाटील (वय 23) हत्या प्रकरणात त्याच्या गावातीलच एकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कोपरगावात या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड राजगुरुनगर घाटात 6 ऑगस्ट रोजी सौरभचा मृतदेह आढळला होता. सौरभ हा 28 जुलैपासून बेपत्ता होता. त्यानंतर जवळपास नऊ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेहच आढळला. शरीरावर जखमांच्या खुणा देखील होत्या. त्यामुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. पण सौरभची हत्या कोणी, का आणि कुठे केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. तेव्हा त्याच्याच कोपरगावातील एक युवक या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले.

सौरभ आणि युवकाचे एका प्रकरणावरुन वाद होते. काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. त्यानंतर सौरभ हिंजवडीतील एका आयटी कंपनीत नोकरीला लागला होता. पण, 28 जुलैपासून तो बेपत्ता होता. मात्र रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबत सौरभ याचे नातेवाईक संदीप सोनावणे यांनी हिंजवडी पोलिसात हरवल्याची तक्रार देखील दिली होती. मात्र त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गालत असलेल्या सांडभोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात आढळला होता.

सौरभ पाटील हा हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत कामाला होता. त्याची दुचाकी ही खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच दुचाकीची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या सांडभोरवाडी जवळ असलेल्या जुन्या खेड घाटात वन विभागाच्या हद्दीत उतरत्या झाडाझुडपांचे वाढलेल्या गवतातील शेतात सौरभ पाटील यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी एकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!