
फलटण प्रकरणात सस्पेन्स वाढला, WhatsApp चॅटींगमध्ये वेगळाच ट्रँगल…
सातारा : फलटण येथे महिला डॉक्टरने हातावर सुसाईट नोट लिहून जीवन संपवलं होते. या नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवले होते. बदने याने आपल्यावर चारवेळा लैंगिक अत्याचार तर प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तिने नोटमध्ये म्हटले होतं. या प्रकरणी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या सगळ्या घडामोडीनंतर पोलिसांनी मृत युवतीसह दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तिघांच्या मोबाईल चॅटींगमध्ये एक वेगळाच ट्रँगल असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. चॅटींगमध्ये सापडलेला संवाद सार्वजनिक करता येण्यासारखा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या तिघांमध्ये नक्की काय बोलणं झालंय? आणि तिघांमध्ये नक्की कनेक्शन काय आहे? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे म्हणाले, “आम्ही त्या भगिनीचा आदर करतो. मात्र मोबाईल चॅटिंगवरून जो ट्रँगल समोर आला आहे, तो गंभीर असून लोकांसमोर आणण्यासारखा नाही. त्यामुळे कुणीही यावर राजकारण करू नये, असे विधान करून गोरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.’
फलटण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आहेत. तिन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कधी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर तिचे नसल्याचे आरोप होतात. मग कुटुंबीय हे हस्ताक्षर तिचेच असल्याचे सांगतात. या जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील चॅटिंग बघितलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे. आपण मृत भगिनीचा आदर करतो आणि त्यामुळेच पोलीस ही वस्तुस्थिती समोर आणत नाहीत. मात्र याचा गैरफायदा घेत काही लोक घाणेरडे राजकारण करत आहेत, असेही गोरे म्हणाले.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…
फलटणमधील मृत डॉक्टर प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर…
सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे अटकेनंतर म्हणाला…
फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…
सातारा! महिला डॉक्टरनं हातावर सुसाइड नोट लिहून संपवलं आयुष्य…

